देहू: देहू नगर पंचायत हद्दीतील माळवाडी या गावात दोन दिवसापासून पिण्याचे पाणी पुरवठा बंद आहे.ऐन गणपती आणि सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.
याबाबत देहू नगरपंचायत चे पाणीपुरवठा विभाग प्रमुख धनंजय नायकवडी यांनी सांगितले, देहू कडून माळवाडी कडे येणारी पिण्याच्या पाण्याची लाईन कापूर ओढ्यात पुलाचे काम सुरू असल्याने बंद आहे .ती लवकरच जोडून पाणीपुरवठा सुरू होईल. तसेच बोडकेवाडी येथून नव्याने टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईन द्वारे माळवाडी कडे पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल .बुधवारी(ता.23) सायंकाळी माळवाडी येथील पाण्याची टाकी भरण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल .
माळवाडी समर्थ नगर येथील रहिवासी अर्जुन खांडेकर यांनी सांगितले ,गेले दोन दिवसापासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच कपडे धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर जावे लागते.
याबाबत पाणीपुरवठा समितीचे चेअरमन सुधीर काळोखे यांनी सांगितले , परडवाल चौकात पाईपलाईन फुटलेली आहे पुलाचे काम सुरू असल्याने. तसेच बोडकेवाडी ते माळवाडी या नवीन योजनेतून पाणी देण्याचा प्रयत्न केला .मात्र पाईपलाईन नवी असल्याने ती काही ठिकाणी लिंक झालेली आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे .लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल .
देहू माळवाडी येथील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त
देहू नगरपंचायत प्रशासनाने माळवाडी गावासाठी नुकतेच 2 कोटी रुपये खर्च करून नवीन पाईप लाईन टाकली.मात्र ती कार्यान्वित झाली नाही.