Contact for Advertising
27 October 2026
← Home
Health Breaking News Super Admin 27 October 2026

देहू कचरा टाकणाऱ्यावर पोलीस गुन्हा दाखल,तर दुसऱ्यावर १० हजार दंड

देहू नगरपंचायत च्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ,रस्त्यावर आणि नदीकिनारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. जो व्यक्ती उघड्यावर कचरा टाकताना आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

देहू : देहू नगरपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणी तसेच कचरा डेपो परिसरात अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर नगरपंचायतीमार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे.
देहू नगरपंचायतीच्या कचरा डेपो परिसरात अनधिकृतपणे कचरा टाकताना तसेच कचरा जाळताना एक इसम आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्यात आली असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, अन्य एका प्रकरणात रस्त्यावर अनधिकृतपणे कचरा टाकताना एक इसम आढळून आल्याने त्याच्यावर ₹१०,०००/- (दहा हजार रुपये) दंडाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देऊ नगरपंचायतीच्या आरोग्य विभाग प्रमुख कविता पाटील यांनी दिली.
कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागेत, नाल्यात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी टाकणे तसेच कचरा जाळणे यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व वायुप्रदूषण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नगरपंचायतीमार्फत नियमित पाहणी व निगराणी ठेवण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यास देहू नगरपंचायतीने सुरुवात केली आहे.
शहरातील नागरिकांनी आपला कचरा इतरत्र न टाकता नगरपंचायतीच्या घंटागाडीमध्येच टाकावा, असे आवाहन मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी केले आहे.
“स्वच्छ देहू, सुरक्षित देहू ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी नगरपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेस सहकार्य करून कचरा कोठेही न टाकता घंटागाडीमध्येच द्यावा,” असे आवाहन नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी केले.