Contact for Advertising
26 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 05 October 2026

देहूरोड वोट चोरी च्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मोर्चा

देहूरोड महाविकास आघाडी तर्फे ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाओ च्या घोषणा

देहूरोड : ‘वोट चोरी’च्या आरोपांच्या निषेधार्थ तसेच मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात महाविकास आघाडी देहूरोड शहर व मित्रपक्षांच्या वतीने सोमवारी (ता. ५) निषेध मोर्चा काढण्यात आला. बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा तलाठी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
मोर्चात पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, पुणे जिल्हा शिवसेना सल्लागार रमेश जाधव, देहूरोड शहर काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे देहूरोड शहर अध्यक्ष मिक्की कोचर, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदिप बालघरे, देहू शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र मोरे, मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, देहूरोड काँग्रेसचे कार्याध्यक्ष वेंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टी. जयसिंग, सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते वेंकटेश विश्वनाथ, विष्णू नरसप्पा, मलिक शेख, वेंकटेश मारीमुत्तू, माजी नगरसेवक अली शेख, अरुण जगताप , राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे समीर सत्तेलू, कैलास गोरवे, अलीम मुल्ला, आरिफ अत्तार, राजेश कदम, अँथोनी स्वामी, दीपक कसबे, विजय पवार, किसन सुरवसे, सोमनाथ परंडवाल, शैलाताई खंडागळे, सुनंदाताई आवळे, देवा कांबळे, गणेश सावंत, राफिक शेख, बाबासाहेब शेलार, बाळासाहेब शिंदे, मोरेश्वर घाडगे, शशिकांत सप्पागुरू, बाबासाहेब दिवसे, मेहरबान सिंग तककी, रंगान्ना राजले यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’ तसेच ‘ ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाओ’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनानंतर देहूरोड तलाठी अशोक अमोदे तसेच पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हवळ यांना निवेदन देण्यात आले.