Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 20 September 2026

|| श्री तुकोबाराय चैतन्य ||

भक्ताच्या चेहऱ्यावर एक विलक्ष्ण तेज झळकते .कांति निर्मळ होऊन शरीर आणि मन सुचिरभूत होते ,असा शुंगर देव आपल्या भक्तास देतो.

अभंग क्रमांक: ३५
अंतरींची घेतो गोडी ।
पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा ।
देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
आपुल्याच वैभवें ।
शृंगारावें निर्मळे ॥२॥
तुका म्हणे जेवी सवें ।
प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥
_______________________
|| श्री तुकोबाराय चैतन्य ||
_____________________
"जीव व परमात्मा" हे वेगळे नसून दोन्हीही एकच असल्याने भक्तांच्या मनातील खराभाव
१) कामना धरून आहेत, की
२) निष्काम फलशा सोडून आहेत,
तो परमेश्वर अंतर्यामी असल्याने त्याला भक्तांच्या अंतःकरणातील शुद्धभावना समजते .आणि त्यांच्या अंतःकरणातील भाव पाहुन त्या दोघांची इच्छा तो पूर्ण करतो .परंतु निष्काम भावाने शरण आलेल्या भक्ताची सर्व पातके नष्ट करून त्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त करतो .
महाभारतातील एकप्रसंग:-
महायुद्धापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी गेले , अर्जुन आणि दुर्योधन यांचे दोघांचे भाव वेगवेगळे होते. अर्जुनाला श्रीकृष्ण हवा होता तर दुर्योधनाला श्रीकृष्णाची अत्यंत बलाढ्य नारायणी सेना हवी होती. त्यांच्या भावा प्रमाणे दुर्योधनाला बलाढ्य सेना तर अर्जुनाला सारथी म्हणून भगवान श्रीकृष्ण मिळाले व हे धर्मयुद्ध पांडवानी जिंकले. संपूर्ण विश्वात परमेश्वरच भरून राहिला असल्याने तो फक्त पांडव आणि कौरवांचाच सायरा नव्हता !
विश्वव्यापी माया।
तिणें झाकुळिली छाया।।
(श्री संत तुकाराम महाराज)
विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी।
नये अनुमानासी वेदशास्त्रा।।
(श्री संत एकनाथ महाराज)
ब्रम्हांडनायक विश्वाचा गोसावी।
केला पांडवी म्हणियारा।।
(श्री संत नामदेव महाराज)
म्हणून या प्रस्तुत अभंगात श्रीसंत तुकाराम महाराज देवाला
देव सायरा,
देव सायरा,
देव सायरा दीनाचा
असे तीन वेळा म्हणतात.
लेंकराचें हित।
वाहे माऊलीचें चित्त।।
भगवंताची खरी कृपा झाल्यावर आपल्या
तान्हया लेंकरांची आई जसी चिंता वाहते तसे
आपुल्या वैभवें।
शुंगारावें निर्मळ।।
आपुल्या जवळ जे सामर्थ्य आहे ते वैभवच निर्मळमानाने देव भक्तास प्रदान करतो.
भक्ताच्या चेहऱ्यावर एक विलक्ष्ण तेज झळकते .कांति निर्मळ होऊन शरीर आणि मन सुचिरभूत होते ,असा शुंगर देव आपल्या भक्तास देतो.
तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ।
विशेष हा लाभ संत संगे।।
तुकाराम महाराज म्हणतात ,वैकुंठात दुर्मिळ असलेला काला देव भक्तांबरोबर करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करून काल्याचाप्रसाद भक्षण करतो.
तुका म्हणे जेवी सवें।
प्रेम द्यावे प्रीतिचें।।
।। रामकृष्णहरी ।।
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.