देहूरोड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते क्रिकेटपटू साजिद तांबोळी आणि अन्वर अन्सारी यांचा मंगळवारी(ता.15) मुंबई येथे सत्कार करण्यात आला .
दिव्यांग कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) अंतर्गत खेळणारे भारतीय दिव्यांग क्रिकेटपटू साजिद करीम तांबोळी आणि अन्वर अन्सारी यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली होती. देहूरोड मधील या दोन्ही खेळाडूंनी श्रीलंका दौऱ्यावर तीन टी 20 आणि एका कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दोन्ही खेळाडूंचा मुंबई येथे मंगळवारी सत्कार केला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग खेळाडूंच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांचे देहूरोडकरांच्या वतीने आभार मानण्यात आले.
याबाबत देहूरोड मधील क्रिकेटपटू राजू रत्तु यांनी सांगितले , दिव्यांग खेळाडूंना मिळणारे हे प्रोत्साहन निश्चितच अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. देहूरोड शहरात विविध क्रिकेट सामन्यांमध्ये हे दोन्ही खेळाडू अनेक वर्षापासून खेळत असून त्यांना योग्य न्याय मिळाला आहे. देहूरोडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते क्रिकेटपटू साजिद तांबोळी आणि अन्वर अन्सारी यांचा सत्कार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांचे देहूरोडकरांच्या वतीने आभार.