Contact for Advertising
26 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 19 September 2026

देहू विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी बाळासाहेब टिळेकर यांची नियुक्ती

प्रत्येक शेतकऱ्याला विविध कार्यकारी सोसायटीचा अभ्यास आणि शेतकऱ्यांसाठी कार्य करता यावे, यासाठी ही निवड केली आहे -चेअरमन नंदकुमार काळोखे

देहू: देहू मजरे माळवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत सदस्य पदी बाळासाहेब नारायण टिळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी (ता.18) सोसायटीच्या सभागृहात संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी आहे.
यावेळी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नंदू काळोखे, उपाध्यक्ष शांताराम शेवकर, ज्येष्ठ शेतकरी प्रकाश टिळेकर, संचालक गुलाब काळोखे ,सतीश काळोखे, राजू काटे, विठ्ठल काळोखे, सुरेश हगवणे,
दुर्गाजी चव्हाण ,धनंजय मुसडगे, सचिव गजानन रणपिसे, संचालिका बेबी हगवणे, कल्पना मोरे व इतर उपस्थित होते.