Contact for Advertising
26 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 27 September 2026

देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मंगळवारी सर्वसाधारण सभा

देहु मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार ( ता.२९) रोजी सकाळी ११.०० वा हनुमान मंदिर

देहू : देहु मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार
( ता.२९) रोजी सकाळी ११.०० वा हनुमान मंदिर देहूगाव येथे होणार आहे. सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी उपस्थित रहावे , असे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेपुढे अध्यक्ष यांची निवड करणे, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२५-२०२६ च्या तेरिज. नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे, सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, सन २०२७- २०२८ चे कमाल मर्यादा पत्रक तयार करणे, सन २०२५ - २०२६ च्या शासकीय लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व दोष दुरुस्ती अहवाल पाठविणेबाबत, सन २०२५-२०२६ करीता शासकीय लेखापरीक्षक यांची नेमणुक करणे. व त्यांचे मानधन ठरविणे, थकबाकीदार सभासदांची यादी वाचून दाखविणे,पीक कर्ज एकरी ४००००/- मिळावे, अक्रियाशील सभासदांची यादी वाचन करणे, मयत सभासदाचे वारस नोंद करणेबाबत आणि अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणा-या विषयांवर चर्चा करणेत येणार आहे.संस्थेच्या कामकाजाविषयी लेखी स्वरूपात दिनांक २७/०९/२०२६ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात दाखल करण्यात याव्यात नंतर आलेल्या सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे नोटिसीद्वारे सभासदांना कळविण्यात आलेले आहे ,अशी माहिती संस्थेचे सचिव गजानन रणपिसे, अध्यक्ष शशिकांत काळोखे यांनी दिली.