Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 21 September 2026

सार्वजनिक गणेशोत्सवात एकोप्याचे दर्शन - रशिद धोंडफोडे

सार्वजनिक गणेशोत्सवातून प्रेरणा घेऊन अनेक विधायक कामे केली जातात. उत्सव हे भारतीय संस्कृती चे प्रतीक

देहू: सार्वजनिक गणेशोत्सवात एकोप्याचे दर्शन घडते, असे प्रतिपादन देहू शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष व मुस्लिम बँक पुणेचे वरिष्ठ व्यवस्थापक रशीद धोंडफोडे यांनी रविवारी (ता.20) देहू येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त "देहू संतवाणी "कार्यालयामध्ये रशीद धोंडफोडे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे, देहू काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली.
कांतीलाल काळोखे म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवातून प्रेरणा घेऊन अनेक विधायक कामे केली जातात. उत्सव हे भारतीय संस्कृती चे प्रतीक आहे.
ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे यांनी शुभेच्छा दिल्या.