Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 22 September 2026

गणेशोत्सावातून विद्यार्थ्यांत नेतृत्वाचे गुण विकसित - संजय वाघ

सार्वजनिक गणेशोत्सवातून स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश यशस्वी झाला. यापुढे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित व सर्वांच्या फायद्याचे कसे होईल , यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजे.

देहू: सार्वजनिक गणेशोत्सावातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. मात्र हे गुण सकारात्मक हवेत .त्यासाठी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि आपले कर्तव्य याची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देहू माळीनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक संजय वाघ यांनी सोमवारी (ता.21) देहू येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त "देहू संतवाणी "कार्यालयामध्ये मुख्याध्यापक संजय वाघ, देहू नगरपंचायतचे नगरसेवक आदित्य टिळेकर, यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रवीण कांबळे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली.
नगरसेवक आदित्य टिळेकर म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवातून स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देश यशस्वी झाला. यापुढे मिळालेले स्वातंत्र्य अबाधित व सर्वांच्या फायद्याचे कसे होईल , यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजे.
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.