Contact for Advertising
06 September 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 04 August 2026

खासदार संजय राऊत यांचा देहू शहर भाजपकडून जाहीर निषेध

जयकुमार गोरे हे राज्याचे सक्षम ग्रामविकास व पंचायत राज मंत्री. तळागाळातील जनतेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या अशा खंबीर आणि विकासपुरुष नेत्यावर राजकीय वैफल्यातून खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे, ही राऊतांची वैचारिक विकृती आहे. अनिरुद्ध काळोखे - देहू देहूरोड मंडल अध्यक्ष

देहू: महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवसेने( उबाठा) चे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा देहू शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
जयकुमार गोरे हे गाव तिथे विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे लोकनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात पंढरीची वारी निर्मल व अपघातमुक्त झाली असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. अशा एका लोकाभिमुख नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संजय राऊत यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर भाजपाने दिला.
निषेध मोर्चा प्रसंगी हवेली पंचायत समिती माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, देहू भाजपा अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे,सूर्यकांत घोलप,नारायण पाचपिंड,सचिन मराठे, प्रा.अमित घेनंद, दत्ता हगवणे, प्रद्युमन टिळेकर, सचिन काळोखे, प्रकाश मोरे, स्वातीताई पिंजन, भक्ती कुरकुट, सरस्वती पिंजण, दादासाहेब लोंढे, जयदीप माने, उमेश शिंदे, बाबू कोळी, अजय तेलगू, प्रसाद सातव, पोपट पवार, वैभव टिळेकर, ऋतिक मोरे, दुर्गेश भालेराव रवी काळोखे स्वामी शेवकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते...