Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 09 October 2026

आकुर्डी प्रा. सुर्यकांत निवृत्ती पोमणे यांची संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित

आकुर्डी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक सुर्यकांत निवृत्ती पोमणे यांचा ‘EXTRACTION OF METAL FROM ORE’ या विषयावरील संशोधन लेख आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनविषयक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रा. पोमणे यांचा हा संशोधन लेख International Research Journal of Modernization in Engineering Technology and Science (IRJMETS) या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाच्या जून २०२६ मधील खंड ८, अंक ६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या लेखाचा पेपर आयडी IRJMETS80600014282असा आहे. या संशोधन लेखाच्या प्रकाशनाबद्दल त्यांना नियतकालिकाकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
धातुखनिजांमधून धातू मिळविण्याच्या विषयावर आधारित या संशोधन लेखाच्या प्रकाशनामुळे प्रा. पोमणे यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानात भर पडली आहे.
प्रा. सूर्यकांत निवृत्ती पोमणे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.