मुंबई : पोलीस स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव, मुंबई येथील पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशसेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विविध अधिकारी तसेच अन्य उपस्थित होते.
पोलीस स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्मा पोलिसांना अभिवादन
मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.