Contact for Advertising
06 September 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 09 August 2026

देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतला ग्रामस्थांकडून स्वागत

परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निगडी ते देहू परिसरात भाविकांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले

देहू ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (ता.9 )पंढरपूरहून देहू मध्ये परतला. 34 दिवसांच्या प्रवासानंतर तुकोबा तुकोबा नाम जयघोष आणि टाळमृदंगाच्या निनादात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुपारी एक वाजता देहूत आगमन होताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 7 जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते.पंढरपूरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांच्या समवेत वारी सर्मपित करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीचा मार्ग धरत पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी मुक्कामी होता. रविवारी सकाळी सात वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निगडीकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचे निगडीतील भक्ती शक्ती उद्यानाजवळ महापालिका आणि निगडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत झाले.
जगदगुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निगडी येथील श्री खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. एकादशी असल्यामुळे पहाटे 5 वाजता मंदिरात शंकराच्या पिंढीस व खंडोबाच्या मुर्तीस महाअभिषेक करण्यात आला. यानंतर काकडा आरती संपन्न झाला.सकाळी 9 वा.चकरेश्वर महिला भजनी मंडळाची भजन सेवा संपन्न झाली.पालखी सोहळ्याचे स्वागत फुलांचा वर्षाव करत पालखी रथाचे स्वागत करण्यात आले.यानंतरॲड.धनश्री काळभोर , आकाश काळभोर, जयदीप खापरे सपत्नीक यांच्या हस्ते पादुकांचे पुजन व आरती करण्यात आली.यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांनी दर्शन घेतले.यानंतर खंडोबा देवस्थान, व्यापारी व परिसरातील भाविकांच्या योगदानातून खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आले.आमदार उमा खापरे पिंपरी - चिंचवड च्या उपमहापौर शर्मिला बाबर , 'अ' प्रभाग अध्यक्षा अर्चना कारंडे,नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शैलजा मोरे
आप्पासाहेब बागल, सचिन चिखले, श्रीधर वाल्हेकर, विजय आण्णा जगताप,इंद्रसिंग राजपूत,सुधीर ढगे तसेच पालखी सोहळ्याचे प्रमुख उमेश महाराज मोरे, मा.अध्यक्ष नितीन महाराज मोरे,मा. विश्वस्त सुनिल महाराज मोरे तसेच पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर , देहूरोड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव विजय ढमाळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हाळुंगे उपस्थित होते
निगडी येथील कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष तानाजी काळभोर,उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगलीमहाराज काळभोर,सचिव भाऊसाहेब काळभोर,कार्याध्यक्ष शंकर आप्पा काळभोर,विश्वस्त ॲड.राजेंद्र काळभोर, राजेंद्र ल.काळभोर, दिपक काळभोर, दिलिप काळभोर, चेतन काळभोर, गणेश काळभोर व निगडी ग्रामस्थ यांनी केले होते. त्यानंतर निगडी ते देहूरोड मार्गे चिंचोली येथील शनि मंदिरात दुपारी साडेबारा वाजता पालखीचे आगमन झाले.या ठिकाणी संस्थानच्या वतीने अभंग आरती झाली. देहू पंचक्रोशीतील नागरिक पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.त्यानंतर पालखी देहूतील अनगडशावली बाबा मंदिराजवळ आली.या ठिकाणी अभंग आरती झाली.टाळमृदंगाच्या गजरात पालखीचे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले.गावातील तुपे कुटुंबाकडून परंपरेनुसार प्रवेशद्वाराजवळ दहीभाताचा नैवेद्य दाखवला.प्रवेशद्वाराजवळ आबालवृद्धांनी दर्शनासाठी
गर्दी केली होती.त्यानंतर पालखीचे बाजारपेठ मार्गे देऊळवाड्याकडे मार्गस्थ झाली.
दुपारी पालखीचे देऊळवाड्यात आगमन झाले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर भजनी मंडपात आरती झाली.यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे,विश्वस्त गणेश महाराज मोरे,माणिक मोरे,, माजी विश्वस्त सुनिल महाराज मोरे व इतर उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या विणेकऱ्यांचा संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.
सीओडी कामगारांच्या वतीने सत्कार:
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या आगमनाचे औचित्य साधून 'सी. ओ. डी. देहूरोड डेपो'चे कामगार आणि संघटनेच्या वतीने सर्व वारकरी व भाविकांना फराळ (राजगिरा लाडू) वाटप करण्यात आले. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
​या उपक्रमाचे आयोजन आणि संपूर्ण व्यवस्था डेपो वर्क्स कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्क्स कमिटीचे व्हाईस चेअरमन उमाकांत लिलाकर, सेक्रेटरी संजय जगदीश डुमडे, तसेच कमिटी सदस्य विकास बालघरे, आकाश पिल्ले, राहूल आसबे आणि निरंजन कारेकर यांनी नियोजन केले होते
​या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी फराळाचा लाभ घेतला.