Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 18 August 2026

पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव आणि आषाढी वारी पालखी सोहळ्याचे जनक होते.

देहू : पालखी सोहळा जनक तपोनीधि नारायण महाराज यांची पुण्यतिथी निमित्त संत तुकाराम महाराज संस्थानवतीने विविध कार्यक्रमांचे देऊळवाड़ा येथे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे विट्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा
मंदिरात संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. तपो निधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्थ दिलीप महाराज मोरे , उमेश महाराज मोरे, विक्रम सिंह महाराज मोरे ,गणेश महाराज मोरे यांच्या हस्ते महापुजा झाली.
देऊळवाड्यातील भजनी मंडपात पुंडलिक महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले.संस्थान च्या वतिने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.