Contact for Advertising
26 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 18 September 2026

देहू व देहूरोड पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त दीपोत्सव, भजन आणि अभिनंदन कार्यक्रम संपन्न

माजी आमदार अश्विनीताई जगताप यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.तसेच पंतप्रधान मोदीजींच्या कार्याचा गौरव केला.

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त देहू - देहू रोड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी इंद्रायणी नदीकाठी दीप प्रज्वलन व वारकऱ्यांसोबत भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
एक दिया - आशीर्वाद का' (दीप प्रज्वलन)कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या प्रांगणात वारकरी विद्यार्थ्यांसोबत भजन करून मोदीजींना त्यांच्या भावी निरोगी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा, सदिच्छा व शुभ आशीर्वाद देण्यात आले.
माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे उपस्थित होते.
दुपारी भाजपा जनसंपर्क कार्यालयात 'सेवा संकल्प अभियान' (17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर) अंतर्गत मोदीजींचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जात असताना, देहूरोड येथे देखील मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार अश्विनीताई जगताप यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.तसेच
पंतप्रधान मोदीजींच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, आज 17 सप्टेंबर 1950 रोजी वडनगर येथे जन्मलेले मोदीजी 76 वर्षांचे झाले आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून ते 7 ऑक्टोबर 2026 रोजी सलग 25 वर्षे सरकारचे प्रमुख म्हणून इतिहास रचत आहेत. जून 2026 मध्ये त्यांनी पंडित नेहरूंचा विक्रम मोडून भारताचे सर्वात जास्त काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान मिळवला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, 80 कोटी गरीबांना मोफत धान्य, 4 कोटी पक्की घरे, 12 कोटी शौचालय, आयुष्मान भारत सारख्या योजना मिळाल्या, असे गौरवोद्गार काढण्यात आले.
देहू देहू रोड शहराध्यक्ष रघुवीर शेलार ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे , सरचिटणीस
नारायण तात्या पचपिंड ,भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे संभाजी टिळेकर,सचिन मराठे ,प्रदुम्न टिळेकर ,रवींद्र काळोखे , रायबा मोरे ,ऋषिकेश मोरे , दत्ता हगवणे ,
संतोष हगवणे ,सागर म्हसुडगे, बाळासाहेब दरेकर, प्रवीण कांबळे, प्रशांत मेंडके, संदीप कांबळे, स्वामी शेवकर व भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.