Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 24 August 2026

देहू नगरपंचायतच्या नवीन बहुउद्देशीय इमारतीस स्व. बाबासाहेब इनामदार यांचे नाव द्यावे- नगरसेवक प्रवीण काळोखे

ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी स्वर्गीय बाबासाहेब इनामदार यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ जागा विनामूल्य दिलेली आहे. सदर जुन्या जागेवर सन 1958 साली ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

देहू: देहू नगरपंचायत प्रशासनाकडून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागी नवीन बहुउद्देशीय सभागृह, इमारत उभारण्यात येत आहे .या इमारतीस स्व. बाबासाहेब इनामदार यांचे नाव द्यावे, अशी मागणी देहू नगरपंचायत चे नगरसेवक प्रवीण काळोखे यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक प्रवीण काळोखे यांनी निवेदनात म्हटले आहे जुने ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी स्वर्गीय बाबासाहेब इनामदार यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ जागा विनामूल्य दिलेली आहे. सदर जुन्या जागेवर सन 1958 साली ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तरी नगरपंचायत प्रशासन बांधत असलेल्या नवीन बहुउद्देशीय इमारतीस त्यांचे नाव द्यावे .तसेच या इमारतीतील दालनास स्वर्गीय पोलीस निरीक्षक अनिल बंडू हगवणे यांचेही नाव द्यावे.
यावेळी देहू नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक योगेश परंडवाल, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे, बांधकाम सभापती मयूर टिळेकर ,नगरसेवक प्रविण काळोखे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश चव्हाण, महेश दरेकर ,स्वप्निल पवळे व इतर उपस्थित होते.