Contact for Advertising
06 September 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 04 September 2026

देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार

राजकीय समीकरणे आणि मतांची बेरीज यासाठी ही निवड होणार आहे, अशी देऊ नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांत चर्चा आहे.

देहू : देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 11 सप्टेंबरला विशेष सभेद्वारे घेण्यात येणार आहे , अशी माहिती देहू नगरपंचायतच्या कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम यांनी सांगितले.
देहू नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे .
देहू नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या या पदावर नवीन नगराध्यक्षपदी माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांची वर्णी लागणार आहे. देहू नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या पदावर स्मिता चव्हाण यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार आहे. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे. येत्या डिसेंबर अखेर विद्यमान सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपणार आहे.