Contact for Advertising
06 September 2026
← Home
Business Breaking News Super Admin 31 August 2026

देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 'मोरया आर्ट्स'तर्फे बुकिंग सुरू

देहू येथे गणेशोत्सवासाठी सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी सज्ज; 7000 गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध. मोरया आर्ट्सने देहूतील कारखान्यात बनविल्या आकर्षक मूर्ती .

देहू: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र देहूगावात बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाविकांना अत्यंत आकर्षक आणि देखण्या मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी देहूतील प्रसिद्ध 'मोरया आर्ट्स' सज्ज झाले आहे . त्यांच्या वतीने विविध प्रकारच्या सुबक गणेश मूर्ती अत्यंत वाजवी दरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोरया आर्ट्सने गणेशभक्तांच्या आवडीनुसार विविध रूपांतील मूर्तींचे विलोभनीय कलेक्शन आणले आहे. यामध्ये पारंपरिक बैठकीच्या मूर्तींपासून ते अगदी आधुनिक आणि आकर्षक फॅन्सी मूर्तींचा समावेश आहे. यंदा पर्यावरणपूरक उत्सवावर भर देणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष शाडूच्या मातीचे कलात्मक आणि सुंदर रंगकाम केलेले पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याबाबत मोरया आर्ट्सचे सचिन कुंभार यांनी सांगितले, बारीक कलाकुसर पेणच्या प्रसिद्ध मूर्तीकारांच्या शैलीतील अत्यंत सुबक नक्षीकाम आणि डोळ्यांचे विलोभनीय काम करण्यात आले आहे.तसेच विविध आकारात लहानांपासून ते मोठ्या आकारातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी योग्य अशा शेकडो डिझाईन्स आहेत. स्वस्त आणि परवडणारे दर असून वाढत्या महागाईच्या काळातही सर्वसामान्य भाविकांना परवडतील अशा थेट कारखान्यातील दरात मूर्ती उपलब्ध आहेत. नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या इको-फ्रेंडली मूर्तींवर भाविकांचा विशेष भर असतो.
मूर्तींचे मर्यादित स्टॉक उपलब्ध असून, ऐनवेळी होणारी गर्दी आणि धावपळ टाळण्यासाठी भाविकांनी आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती आत्ताच बुक करावी, असे आवाहन मोरया आर्ट्सच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक भक्तांनी मूर्ती पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कुंभारवाडा, देहूगाव येथील केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर संपर्क साधावा.