Contact for Advertising
06 September 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 24 August 2026

चिंचवड येथे 29 ऑगस्टला कथाकथन स्पर्धा व कार्यशाळा

संस्कार भारती पश्चिम प्रांत आयोजित,संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्टला कथाकथन कार्यशाळा.

चिंचवड : मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'संस्कार भारती पश्चिम प्रांत' यांच्यावतीने 'कथाकथन स्पर्धा आणि कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 'कथाकथी' या विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते संध्याकाळी ८ या वेळेत करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा भारत माता भवन, बकाउ वुल्फ कॉलनी, लिंक रोड, चिंचवड येथे आयोजित करण्यात आली आहे

सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक मा.प्रमोदजी पवार या कार्यशाळेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत ,अशी माहिती संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती उपाध्यक्ष व उपक्रम प्रमुख नरेंद्र आमले व सचिव लीना आढाव यांनी दिली.
संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या स्थानिक आयोजनाखाली होणाऱ्या या कार्यशाळेसाठी १८ वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी आसावरी बर्वे, भावना सामंत, संजय चांदगुडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष डॉ नंदकिशोर कपोते, उपाध्यक्ष नरेंद्र आमले, सचिव लीना आढाव व साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष श्री राजन लाखे यांनी केले आहे.