Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 23 September 2026

देहू आळंदी मार्गावरील कमानीचे काम पूर्ण करा

कमानीचे काम त्वरित पूर्ण करावे - महापौर रवी लांडगे

देहू : देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी त्वरीत सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
देहू-आळंदी रस्त्यावरील काळोखे चौकाजवळील कमानीचे काम रखडलेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दररोज होत असते . वाहतूक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत .तसेच देहू आळंदी कडे जाणारे भाविकही या कोंडी त्रस्त आहेत. त्यामुळे याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी , अशी मागणी महापौर रवी लांडगे यांच्याकडे करण्यात आली होती .या पार्श्वभूमीवर महापौर रवी लांडगे यांनी मंगळवारी( ता.22)या कमानीची पाहणी केली. तसेच तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
देहू देहूरोड शहर भाजप अध्यक्ष रघुवीर शेलार, अनिरुद्ध काळोखे यांनी कमानीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन महापौर रवी लांडगे यांनी तातडीने काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.