Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 29 September 2026

श्री शिवाजी विद्यालयात ‘जंक फूडचे दुष्परिणाम’ विषयावर व्याख्यान

विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देत जंक फूड टाळण्याचे आवाहन

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘जंक फूडचे दुष्परिणाम’ या विषयावर मंगळवारी (ता. 29) विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सुनील अडसुळे उपस्थित होते.
प्रा. अडसुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, जंक फूडमध्ये असणारे अतिरिक्त साखर, मीठ व तेल यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. लहान वयातच उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच पचनसंस्थेशी संबंधित विकारांचा धोका वाढू शकतो. अशा पदार्थांमधील हानिकारक घटकांमुळे शरीराची पचनक्रिया कशी बिघडू शकते, हेही त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स यांसारख्या पदार्थांचे सेवन टाळून त्याऐवजी घरगुती व सकस आहाराचा स्वीकार करणे ,आरोग्यासाठी किती आवश्यक आहे, हे प्रा. अडसुळे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनील अडसुळे यांचे स्वागत व सत्कार प्राचार्य एस. पी.जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका ए.टी.काळे यांनी केले.
यावेळी शिक्षक एन.एन.मानकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहार घेण्याची शपथ दिली. पर्यवेक्षिका शामला पंडित यांनी जंक फूडवर आधारित कविता सादर करून उपस्थितांचे आभार मानले