Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 01 October 2026

गांधी जयंतीनिमित्त इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान

इंद्रायणी नदी ही देहूच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून तिचे पावित्र्य व स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

देहू : महात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्या शुक्रवार (ता. २ ऑक्टोबर) देहू पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहभागातून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘नमामी इंद्रायणी सेवा अभियान’ अंतर्गत इंद्रायणी मातेची स्वच्छता व सेवा करण्यात येणार आहे.
वर्षभर नदीपात्रात भाविक तसेच नागरिकांकडून अनावधानाने टाकण्यात आलेले जुने कपडे, प्लास्टिक, मडकी तसेच देवदेवतांचे फोटो व इतर निर्माल्य नदीपात्रातून बाहेर काढून नदी घाट स्वच्छ करण्यात येणार आहे.
अखिल विश्व गायत्री परिवार आणि नमामी इंद्रायणी सेवा अ यांच्या नेतृत्वाखाली, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मुसुडगे यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमास देहू नगरपंचायत तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांचे सहकार्य लाभणार आहे.
इंद्रायणी नदी ही देहूच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून तिचे पावित्र्य व स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे देहू पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मुसुडगे यांनी केले आहे.
“आपली उपस्थिती हीच इंद्रायणी मातेची सेवा आहे. चला, एकत्र येऊया आणि इंद्रायणी स्वच्छ ठेवूया.”