देहू: देहू आणि देहूरोड परिसरात विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने 80 वा स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला .
देहू नगरपंचायत कार्यालयासमोर नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम ,सर्व नगर सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देहू नगरपंचायतचे स्वीकृत सदस्य दीपक खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस देहू शहराध्यक्ष विवेक काळोखे, महिला शहराध्यक्षा मेधा काळोखे,चैत्राली भसे
यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅग, शालेय स्पोर्ट्स ड्रेस आणि शाळेला मोफत खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गटनेते योगेश परंडवाल, प्रदीप परंडवाल, गणेश टिळेकर ,स्वीकृत नगरसेवक अमित टिळेकर, संदीप बाळासाहेब परंडवाल ,प्रद्युम्न टिळेकर, रुचिर टिळेकर, सुनिता टिळेकर ,भाजपचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल ,शाळेचे मुख्याध्यापक विवेक नरवडे, संजय वाघ ,मीनाक्षी वानखेडे व इतर उपस्थित होते.
संत तुकाराम विद्यालय व कन्या विद्यालयात ज्येष्ठ नागरिक नारायण मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर , विद्या कांबळे व इतर यावेळी उपस्थित होते. देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी डॉ. मेघा पद्मने , भाजप शहराध्यक्ष अनिरुद्ध काळोखे आणि नागरिक उपस्थित होते यावेळी अंमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेण्यात आली.
देहूतील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये विवेक काळोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी नगरपंचायत सदस्य प्रवीण काळोखे संतोष काळोखे मुख्याध्यापक राजाराम हगवणे ,अनिल नरवडे व इतर उपस्थित होते. यावेळी स्कॉलरशिप मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठलवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये नगरपंचायत सदस्या रसिका काळोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अँड. राजेश कातोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शाळेचे संस्थापक ॲड. सुनील काळोखे, अध्यक्ष पवन काळोखे, प्राचार्या प्रणिता काळोखे, अशोक येनपुरे, माजी सरपंच अशोक मोरे ,विठ्ठल काळोखे, बाळासाहेब काळोखे व इतर उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विकासनगर येथील साउथ इंडियन असोसिएशनचे सेठ एच्. ए. बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूल ( साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचालित ) मध्ये मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. सुरुवातीला महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी आनम अली हिने देशभक्ती या विषयावर भाषण केले. सर्व विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेण्यात आली. तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी कॉपी फ्री परीक्षा याची शपथ घेतली. संचलक पथकातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलनाचे सादरीकरण केले.
शाळेतील विद्यार्थिनींनी सुंदर भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी “ऑपरेशन सिंदूर” हा हृदयस्पर्शी प्रसंग अतिशय सुंदर रित्या सादर केला. येलो हाऊस च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट देशभक्तीवर आधारित गीताचे गायन केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नगरसेविका ऐश्वर्या तरस , साऊथ इंडियन असोसिएशनचे व शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, शाळेच्या सचिव पार्वती बाबू, संस्थेचे उपाध्यक्ष ए .के. प्रेमचंद्रन, शाळेचे उपाध्यक्ष के. के .पिल्ले , खजिनदार जेकब जी. नाडार, सहमुख्याध्यापिका शेरीन कुरीयन , शाळेचे सदस्य जोगिंदर भाटिया, एस .डेव्हिड नाडार , गोपालराव व्यंकोबा, पी. हेमंत कुमार व संस्थेचे सभासद मनोज संक्रांती, संबत भोईटे, शहासाब शेख , शुभांगी वानखेडे, राजेंद्र तरस, राजेंद्र नेटके व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील सुहानी रसाळ आणि रितिका सरक यांनी केले.सहशिक्षिका राधिका बक्षी यांनी आभार मानले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
देहूरोड येथील सॅमसंन मेमोरियल रिपब्लिक हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या संस्थापिका मोली सॅमसन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वंदेमातरम्, राष्ट्रगीत , राज्यगीत विद्यार्थ्यांनी गायन केले.शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार सादर केले. नववीच्या मुलींनी लाठी काठी हा साहसी क्रीडा प्रकार सादर केला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिड हा साहसी क्रीडा प्रकार सादर केला. शाळेच्या मुख्याध्यापिका संयुक्ता आरेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेतील क्रिडा शिक्षक आनंद टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधात शपथ दिली. गेल्या वर्षी दहावीत प्रथम , द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रिया नायर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी भाविका गायकवाड, अर्चना अडागळे, अर्चना वाघमारे, सुरेखा अहिरे, शीतल बोकड, मोनिका पाटील, जयंता ढोबळे, दिपाली शिंदे, गौरी भांडवलकर, निकिता गायकवाड, रोझिटा फर्नांडो, अश्विनी कोष्टी उपस्थित होते. सूत्रसंचालन नूतन जाधव यांनी केले. सपना शिंदे यांनी आभार मानले.
देहू देहूरोड परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
विविध संस्था, संघटना आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जय ,वंदे मातरम घोषणा देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.