देहूरोड : ऐतिहासिक सुभाष चौक येथे देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर मारीमुत्तू व उपाध्यक्ष वेंकटेश कोळी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे उपाध्यक्ष अबूबखर लांडगे, मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष मिकी कोचर, मावळ तालुका नेते संजय पिंजण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देहूरोड काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकर टी. जयसिंग, सचिव गोपाळ वेंकोबा राव, सहसचिव बबन टोम्पे, ज्येष्ठ नेते अशोक कुसळे, युवा नेते मलिक शेख, विल्सन पालिवाल, विष्णू नारासाप्पा, संतोष पांडियान, आकाश रामनारायण, राकेश सोळंकी, वेंकटेश मारीमुत्तू, आसिफ सय्यद, मारीमुत्तू अम्मावसी, तावमनी अम्मावसी, माणिक वाघमारे, किसन सुरवसे, प्रवीण भोसले तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देहूरोड महात्मा गांधी - लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन
महात्मा गांधींचे अहिंसावादी विचार आणि लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधान असताना साधे राहणीमान याचे अनुकरण सर्व नागरिकांनी करावे