Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 18 September 2026

सार्वजनिक गणेशोत्सवातून एकीचे , संस्कृतीचे दर्शन - सुहास गोलांडे

उत्सवातून समाजाला प्रेरणा देणारे विचार आणि मार्गदर्शन मिळते.वर्तमानपत्रे समाजापुढे सकारात्मक विचार आणून समाजामध्ये बदल घडवतात.

देहू: स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून समाज एकत्र आला आणि अन्याया विरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्यानंतर उत्सवामुळे समाज एकसंध आहे, असे प्रतिपादन हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी गुरुवारी (ता.17) देहू येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त देहू संतवाणी कार्यालयामध्ये
सुहास गोलांडे , देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट )अध्यक्ष संदीप शिंदे ,देहूचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप काळोखे महेंद्र जाधव यांच्या हस्ते गणेश मूर्तीची आरती करण्यात आली.
शहराध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, गणेशोत्सव सणामुळे युवक एकत्र येतात आणि त्यामुळे समाजाचा विकास होतो .
प्रदीप काळोखे म्हणाले, या उत्सवातून समाजाला प्रेरणा देणारे विचार आणि मार्गदर्शन मिळते.वर्तमानपत्रे समाजापुढे सकारात्मक विचार आणून समाजामध्ये बदल घडवतात.
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.