Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 16 September 2026

सण आणि उत्सवामुळे समाज एकत्र- पोलीस उपनिरीक्षक सावनकुमार वाघमारे

वर्तमानपत्रे ही चांगल्या गोष्टी समाजापुढे आणून समाजामध्ये बदल घडवतात .तसेच वाईट गोष्टींवर प्रहार करून प्रशासनाला सरळ करण्याचे काम करतात.

देहू: सार्वजनिक सण आणि उत्सवामुळे समाज एकसंध आहे, असे प्रतिपादन देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सावन कुमार वाघमारे यांनी मंगळवारी (ता.15) देहू येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त देहू संतवाणी कार्यालयामध्ये पोलीस उपनिरीक्षक सावनकुमार वाघमारे, देहू नगरपंचायतचे गटनेते योगेश परंडवाल ,देहू -देहूरोड शहर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, भाजपा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष संदीप परंडवाल, सामाजिक कार्यकर्ते मोहन टिळेकर, भाजपा उपाध्यक्ष प्रद्युमन टिळेकर यांच्या हस्ते गणेश मूर्तीची आरती करण्यात आली.
भाजप शहरचे उपाध्यक्ष सचिन मराठे, रायबा मोरे, बाळासाहेब टिळेकर राजू वाघ, यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे व इतर उपस्थित होते.
गटनेते योगेश परंडवाल म्हणाले, वर्तमानपत्रे ही चांगल्या गोष्टी समाजापुढे आणून समाजामध्ये बदल घडवतात तसेच वाईट गोष्टींवर प्रहार करून प्रशासनाला सरळ करण्याचे काम करतात. त्यामुळे समाजाचा विकास होतो .समाजातील घडलेल्या घटना तटस्थपणे मांडणे हे पत्रकाराचे काम असते. सचिन मराठे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले ,देहू आणि परिसरातील विविध घटना संदर्भात देहू संतवाणी मधून बातमी आल्याने देहूतील विकासाला चालना मिळेल.
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.