देहू: आजच्या आणि आधुनिक युगात सार्वजनिक गणेशोत्सवात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे . आधुनिक भारताची विचारधारा युवक गणेशोत्सवातून मांडू शकतात , असे प्रतिपादन युवा उद्योजक प्रथमेश अहिरे यांनी शुक्रवारी (ता.18) देहू येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त "देहू संतवाणी "कार्यालयामध्ये प्रथमेश अहिरे, लोणीकंद येथील उद्योजक उमेश लोखंडे, टिळक विद्यापीठातील मास कम्युनिकेशनचे पूजा गायकवाड , यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांच्या हस्ते गणेश मूर्तीची आरती करण्यात आली.
उद्योजक प्रथमेश अहिरे म्हणाले, गणेशोत्सव सणामुळे युवक एकत्र येतात एकत्र आलेल्या युवकांनी भविष्यात उद्योजकतिकडे वळावे .
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.
आधुनिक युगात सार्वजनिक गणेशोत्सवात युवकांचे योगदान महत्वाचे - प्रथमेश अहिरे
प्रसार माध्यमांमध्ये युवकांना चांगली संधी आहे .या संधीचा युवकांनी उपयोग करून समाज सेवा करावी- पत्रकार पूजा गायकवाड