Contact for Advertising
06 September 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 03 September 2026

दहीहंडी उत्सवात डीजे वापर करू नका, देहूरोड पोलिसांचे आव्हान

डीजे मुक्त सण साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन. गणेशोत्सव काळातही विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी आणणार.

देहू : देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यास श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर तीन दिवसांची परवानगी देण्यात येईल .तसेच या दहीहंडी कार्यक्रमात डीजे वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. सर्व मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन देहूरोड पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी गुरुवारी (ता, 3 ) येथे केले.
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार( ता. 4 )रोजी आहे. दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव विविध मंडळांकडून साजरा करण्यात येतो. मात्र काही मंडळांनी हा उत्सव आठ ,नऊ, दहा तारखेला आयोजित केलेला आहे .तसेच या कार्यक्रमात डीजे चा वापर केला जातो.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी देहू नगरपंचायत कार्यालयात दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली .तसेच त्यांना या उत्सवामध्ये डीजे वापरू नये , लेझरबीम चा वापर करू नये, असे आव्हान केले. यावेळी देहू नगरपंचायत चे मुख्याधिकारी चेतन कोंडे, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे ,पोलीस कर्मचारी दादासाहेब वाबळे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे म्हणाले, कोर्टाच्या एका निकालाने काही जणांवर गुन्हे दाखल झालेले आहे. यंदा आपल्या परिसरात पोलिसांना कडक कारवाई करण्यास भाग पाडू नये. आपल्या परिसरातील मंडळांनी डीजे वापरण्यावर बंदी घालण्यासाठी जागरूकता केली पाहिजे. आपल्याला आध्यात्मिक वारसा लाभलेला असून त्याला गालबोट लागू नये , याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनीही सण साजरे करा ,मात्र मर्यादा ओलांडू नका, असे आवाहन केले.