Contact for Advertising
06 September 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 21 June 2026

योग दिन उत्साहात संपन्न

योगामुळे आरोग्य निरोगी राहते.दिवसातील एक तास योगा करा.

देहू, 21: येथील केंद्रीय आयुध भंडारा मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर, डेप्युटी कमांडंट कर्नल अखिलेश कुमार आणि मेजर वसंत रंजन यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित लष्करी अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना प्रसिद्ध योग गुरु दत्तात्रेय भसे , योग शिक्षिका शुभांगी गाडे, सुषमा पवार, प्रकाश बहाकर, बाबूराव थोरबले आणि लक्ष्मण टिळेकर यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकांसह उत्तम मार्गदर्शन केले. मेजर रतनलाल पाटीदार ,
सी.ओ.डी. वर्क्स कमिटीचे उमाकांत लिलाकर, कमिटी सदस्य निलेश भेगडे, विक्रम टकले विकास बालघरे, आकाश पिल्ले , शबीर इनामदार आणि राहुल असबे उपस्थित होते.सूत्रसंचालन वर्क्स कमिटीचे सचिव संजय डुमडे यांनी केले.