Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 28 June 2026

कोरेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे शांताराम कडूसकर यांचा सत्कार

विविध कार्यकारी सोसायटी या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा विकासाचा कणा आहे.त्याचे संचालक मंडळ हे विश्वासाचे प्रतिक आहे.सोसायटीच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा -अ‍ॅड. गोरक्षनाथ काळे

देहू: देहू शहर काँग्रेस कमिटी,आई फाऊंडेशन आणि देहू ग्रामस्थांच्या वतीने कोरेगाव (ता.खेड) विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शांताराम कडूसकर यांची निवड झाल्याबद्दल रविवारी(ता.28) नागरी सत्कार करण्यात आला.
पुणे बार कौन्सिल असोसिएशन चे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गोरक्षनाथ काळे,देहू विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष अभिमन्यु काळोखे,माजी सरपंच मधुकर कंद, देहू सोसायटीचे सदस्य प्रितम वारघडे,राजेंद्र काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली काळोखे,काँग्रेसच्या वनिता देशकर, माजी अध्यक्ष रशीद धोंडफोडे,युवक अध्यक्ष गणेश मुसुडगे,आई फाऊंडेशन चे किशोर कुलकर्णी,शंकर घनवट, शेखर चव्हाण,सुनिल काळोखे,अण्णासाहेब कुटेकर ,सुनील कडूसकर व इतर उपस्थित होते.
अभिमन्यु काळोखे, मधुकर कंद यांनी मनोगत व्यक्त केले.
अमित घेनंद यांनी सूत्रसंचालन केले.