Contact for Advertising
06 September 2026
← Home
Education Breaking News Super Admin 11 August 2026

जिल्हा परिषद शाळेतील खुशी कांबळे संगीता मुंडे आणि स्वरा ढवळे शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी

शिष्यवृत्ती परीक्षेत खुशी कांबळे, संगिता मुंढे आणि स्वरा ढवळे यांचे यश .कौतुकाचा वर्षाव .

देहू: एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत देहूतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मधील तीन विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या . खुशी सुनील कांबळे, संगिता सोमनाथ मुंढे आणि
स्वरा शांताराम ढवळे यांनी परीक्षेत यश मिळवले.देहू नगरपंचायत प्रशासन आणि शाळेत शाळा प्रशासनाने या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देहू क्रमांक दोन मधील 58 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. शाळेचा निकाल 55 टक्के असून त्यात 3 विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीस पात्र झाल्या आहेत. सदर मुलींना वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक राजाराम हगवणे आणि वर्गशिक्षिका सुप्रिया शेंडे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, लोहगाव केंद्राचे केंद्र समन्वयक नवनाथ सवाने ,हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हेमंत कुमार खाडे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले .