Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 01 October 2026

देहू नगरपंचायतीमार्फत घाट परिसर व संत तुकाराम महाराज शिळा मंदिराची स्वच्छता

देहू नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी यांनी केली स्वच्छता . महात्मा गांधी जयंती निमित्त विविध संस्थांच्या वतीने 2 ऑक्टोबरला ही स्वच्छता मोहीम

देहू : स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हावी, या उद्देशाने देहू नगरपंचायतीच्या वतीने आज घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. देहू नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे स्वच्छता उपक्रमात सहभागी होत इंद्रायणी घाट परिसर स्वच्छ केला.
या उपक्रमांतर्गत घाट परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच इतर अनावश्यक वस्तू हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. देहू येथील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देऊळवाड्यात स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आला. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
स्वच्छता मोहिमेत नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला. सार्वजनिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही नगरपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.