Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 06 September 2026

ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे यांचे वृद्धापकाळाने निधन

संत तुकाराम महाराजांचे वंशज व ज्येष्ठ वारकरी ह. भ. प .गुलाब महाराज मोरे (वय.97)यांचे निधन.

देहू, : संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. गुलाब महाराज रामभाऊ मोरे( वय. ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,तीन मुली, एक भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त राजेंद्र महाराज मोरे हे त्यांचे पुत्र होत . तसेच संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे हे त्यांचे पुतणे होत . त्यांचा अंत्यविधी सोमवार (ता. ७ ) रोजी सकाळी ९.०० वाजता वैकुंठ स्मशान भूमी, श्री क्षेत्र देहू या ठिकाणी होईल.