Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 17 August 2026

देहूत युवकाचा प्रशासना विरोधात संताप. चिखलात उभे राहून वाहन चालकांना केले मार्गदर्शन

देहूतील वाहतूक व्यवस्था सध्या परंडवाल चौकात कोलमडली आहे. देहू नगरपंचायत प्रशासनाने यावर सहा कोटी रुपये खर्च करून उपाय केला .मात्र हा उपाय पूर्णत्वास का गेला नाही. याची ही मालिका भाग एक..

देहू: जे या युवकाला समजले. ते आम्हा स्वतःला जाणकार आहोत. चांगले प्रशासक आहोत .चांगले नगरसेवक आहोत आणि आमचे सरकार चांगले आहे ,असे म्हणणारे आणि मोठमोठे बॅनर चौकात लावून स्वतःची पाठ थोपटून घेणारे आम्ही हे का समजू शकलो नाही, याचे आश्चर्य वाटत आहे. किस्सा आहे अत्यंत रहदारी असलेला देहू देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकाचा.
सोमवारी (ता.17) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक युवक परंडवाल चौकात येलवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्यात उभा होता. तो समोरून येणाऱ्या वाहनांना अडवून बाजूने जा, असे सांगत होता. न ऐकणारे वाहनांना तो शिव्या घालत होता .तसेच त्या पाण्यात उभा राहून खड्ड्यातील पाणी आपल्या गुडघ्यापर्यंत आहे ,हे दाखवत होता. मला वाटले तो उगाचच वाहतूक कोंडी करत आहे. मात्र जवळ जाऊन पाहिले आणि हे भयानक वास्तव नजरेस पडले. परंडवाल चौकातील येलवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाला लागून एक मला मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी साचलेले आहे. शेजारीच कापूर ओढा आहे. मात्र सिमेंटचा बांध असल्याने रस्त्यावरचे पाणी ओढ्यात जात नाही. त्यामुळे पाणी साचून आणि वाहने त्या खड्ड्यातून जाऊन खड्डा खूप मोठा झालेला आहे. या युवकाच्या हे लक्षात आले आणि त्याने आपली दुचाकी त्या खड्ड्यातच उभी केली. बाजूने चिखल होता आणि हा चिखलात उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना बाजूने जा असे सांगत होता. जो ऐकत नाही त्याला शिव्या आणि प्रशासनालाही शिव्या घालत होता. देहू नगरपंचायत चे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना लगेच फोन केला आणि खड्डे असलेला व्हिडिओ त्यांना पाठवला . ते येऊन पाहतो, असे म्हणाले. हे सर्व पाहून एक मनात विचार येतो. या चौकामध्ये दररोज देहूतील नगरपंचायत चे नगरसेवक, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा ,विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते गप्पा मारत उभे असतात. तसेच काहीजण रात्री या ठिकाणी शतपावली करत फिरत असतात. कलकत्ता ,बनारस पानाचा आस्वादही घेत असतात .मात्र गेले महिनाभर या ठिकाणी पडलेला हा खड्डा कोणाच्याही लक्षात आलेला नाही. जाणून बुजुन याकडे कोणी लक्ष देत नाही असे वाटते..
नुकताच परंडवाल चौकातील पुलावर एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला. तरी प्रशासनाला जाग येत नाही हे आमचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज या युवकाच्या रूपाने परंडवाल चौकात एक जेन जी उभा राहिला .भविष्यात अनेक युवक या चौकात उभे राहून या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही असे दिसते.