Contact for Advertising
06 September 2026
← Home
Health Breaking News Super Admin 12 August 2026

देहूत स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान महायज्ञ

देहूत स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान महायज्ञ .लोणारी समाज सेवा संघाचा पुढाकार. वृंदा गुरुकुल फाउंडेशनचे सहकार्य

लोणारी समाज सेवा संघाचा पुढाकार; वृंदा गुरुकुल फाउंडेशनचे सहकार्य

देहू : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देहू येथे ‘रक्तदान महायज्ञ २०२६’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोणारी समाज सेवा संघ, श्रीक्षेत्र देहू यांच्या पुढाकाराने आणि वृंदा गुरुकुल फाउंडेशन व अकॅडमी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हनुमान मंदिर, देहू येथे रक्तदान शिबिर होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान द्यावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तुमच्या रक्ताचा एक थेंब, कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

या उपक्रमात युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्या मित्रपरिवारासह रक्तदानासाठी उपस्थित राहून हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल करांडे यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा दिवस म्हणून साजरा व्हावा. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

दरम्यान, वृंदा गुरुकुल फाउंडेशन व अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रा. रुपेश फोंडे यांनी सांगितले. ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच विविध कोर्सेस मोफत तसेच अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून ‘एक थेंब रक्त... अनेक आशांना जीवन!’ हा सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.

स्थळ : हनुमान मंदिर, देहू
दिनांक : १५ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ८ ते दुपारी ४
आयोजक : लोणारी समाज सेवा संघ, श्रीक्षेत्र देहू
सहकार्य : वृंदा गुरुकुल फाउंडेशन व अकॅडमी