Contact for Advertising
06 September 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 16 June 2026

देहूतील समस्यां त्वरीत सोडवा -देहू देहूरोड शहर भाजप

आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात आणि नदीतील प्रदूषण थांबवावे ,अशी मागणी देहू देहूरोड शहर भाजपच्या वतीने करण्यात आली.

देहू, : देहू नगरपंचायत हद्दीत विविध नागरी समस्या आहेत. नगरपंचायत प्रशासनाने समस्यांबाबत त्त्वरीत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी देहू देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.
माळीनगर , कृष्ण मंदिर परिसर, वॉर्ड क्र. १५ येथील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. विविध भागात पथदिवे बसवावेत. तसेच इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्यूमुखी पडलेले आहेत. नदीत वाढलेले जलप्रदूषण या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.आषाढी वारीच्या पूर्वी कामे पूर्ण करण्यात यावी.
मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी निवेदन स्वीकारले.
शहराध्यक्ष रघुवीर शेलार,सविता पिंजण, सरस्वती पिंजण, अनिरुद्ध काळोखे, रवींद्र काळोखे, संदीप परंडवाल, प्रधुग्न टिळेकर, स्वामी शेवकर, रायबा मोरे उपस्थित होते.