Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 20 September 2026

नाठाळाचे माथी हाणू काठी, हे लेखणीतून दाखवावे- रणजीत काकडे

समाजाच्या विकासात प्रसार माध्यमांचे योगदान महत्वाचे - रघुवीर शेलार

देहू: आजच्या काळात सार्वजनिक जीवनात प्रसारमाध्यमांचे काम उत्तम रीतीने सुरू आहे. प्रसार माध्यमांमुळे समाजातल्या सामान्य माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या जातात. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळतो .त्यामुळे आजच्या काळात प्रसारमाध्यम राष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. व त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे ,असे प्रतिपादन देहू देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक रघुवीर शेलार यांनी शनिवारी (ता.19) देहू येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त "देहू संतवाणी "कार्यालयामध्ये रघुवीर शेलार, मावळचे माजी उपसभापती शांताराम बापू कदम ,उद्योजक रणजीत काकडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली. यावेळी राहुल काकडे, मयूर शेलार, योगेश शेलार, भाजपा युवा शहराध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, ज्येष्ठ नेते अशोक साकोरे, प्रद्युम्न टिळेकर , संभाजी टिळेकर, तात्या पचपिंड, प्रगतशील शेतकरी रवी काळोखे, भाजपा देहू सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष संदीप परंडवाल, उपाध्यक्ष सचिन मराठे, येलवाडी गावचे माजी सरपंच नितीन गाडे, दिलीप हगवणे, अजय तेलगू, सचिन काळोखे ,अमोल एडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उद्योजक रणजीत काकडे म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव सणामुळे युवक एकत्र येतात . या एकत्रित आलेल्या शक्तीचा वापर समाजाच्या विधायक कामासाठी होत असतो. त्यामुळे समाजाचा विकास करणे शक्य होते.
ते पुढे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात महाराज म्हणतात,
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥
भले तरी देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
तुकोबारायांच्या अभंगा प्रमाणे "देहू संतवाणी "या प्रसारमाध्यमाने आपली भूमिका चोख बजावून जिथे अन्याय होत असेल, त्या ठिकाणी नाठाळाचे माथी हाणू काठी, हे आपल्या लेखणीतून दाखवावे.
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.