Contact for Advertising
26 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 03 October 2026

देहू ते देहूरोड पालखी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; ज्येष्ठ नागरिकांकडून खड्ड्यांचे पूजन करून निषेध

पालखी मार्गाची अशी अवस्था राहणे ही चिंतेची बाब असून, वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी,” अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली.

देहू : देहू ते देहूरोड हा पालखी मार्ग झेंडे मळा ते देहू फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सुमारे सात-आठ महिन्यांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्याची दुरवस्था आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिंचोली येथील ज्येष्ठ नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन केले. यावेळी प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
यात रमेश जाधव, बाळासाहेब जाधव, तुकाराम नाना जाधव, श्रीरंग सावंत, संजय पिंजण, संजय सावंत, जयवंत पानसरे सहादू पानसरे, सचिन पानसरे, मनोजकुमार तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.