Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 17 September 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।

संत तुकाराम महाराज म्हणतात, मला कोणीही काहीही चांगले किंवा वाईट बोलले तरी त्यांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष्य करीन .कारण माझी संपूर्ण काया आता हरिरत झाली आहे.

अभंग क्रमांक: ७
वाळो जन मज म्हणोत शिंदळी ।
परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडूनि लौकिक झालियें उदास ।
नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां ।
म्हणे झाले तुका हरीरत ॥___________________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।___________________________
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे गाथेतिल यापुढील २५ अभंग विरण्याचे अभंग आहेत.(देहूकर संस्थान गाथेत पहावे)तुकाराम महाराज या अभंगात स्वत:ला श्री कृष्ण अवतारातील गोपिका म्हणून पहात आहेत. ही भक्ती लौकिक प्रेमाची,शारीरीक सुखाची किंवा भोग सुखाची नसून श्रीकृष्ण भगवान ईश्वराप्रति असलेल्या रूपचिंतनाची मधुरा भक्ति आहे. कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झालेत की “लोकांनी वाळीत टाको, व्याभिचारीण स्री प्रमाणे टाकून बोलोत परंतू या वनमाळीला मी कधीही विसरणार नाही. एखाद्या पतिव्रता स्री प्रमाणे कृष्णला तल्लीन झालेले आहेत. आता जगातील लौकिक व्यवहार टाकून संपूर्णपणे उदास झाले आहेत. जीवनात कोणाचे भय किंवा चिंता राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता मला कोणीही काहीही चांगले किंवा वाइईट बोलले तरी त्यांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष्य करीन .कारण माझी संपूर्ण काया आता हरीरत झाली आहे.
क्रमश:
।। रामकृष्णहरी।।
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष- संत तुकाराम महाराज संस्थान देहू.