Contact for Advertising
06 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 20 August 2026

शेतकरी शास्त्रज्ञ मंच प्रशिक्षण कार्यक्रम माळवाडी येथे संपन्न

शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करून त्या अंतर्गत कृषी विदयापीठ संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाणार आहे .

देहू: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे व तालुका कृषी अधिकारी हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ मंच प्रशिक्षण कार्यक्रम माळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.
तालुका कृषी अधिकारी अमित रणवरे व मंडळ कृषी अधिकारी मोशीचे तुषार खंडागळे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमांस सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड, सह प्राधापाक डॉ . रणजित निंबाळकर, डॉ. सुनील लोहाटे, डॉ. नजीर तांबोळी उपस्थित होते. शेतकरी मंच स्थापन करून त्या अंतर्गत कृषी विदयापीठ संशोधन शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवले जाईल, याविषयी सखोल मार्गदर्शन प्राध्यापक डॉ. लाड यांनी केले. तसेंच विविध जैविक बुरशीनाशके, किडी यावर मार्गदर्शन डॉ. तांबोळी यांनी केले. श्री. निंबाळकर व लोहाटे यांनी फुलपिके, भाजीपाला पिके यावर जमलेल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. सोयाबीन व भात प्लॉट वर भेट देऊन कीड रोग मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांस रेश्मा शिंदे यांनी आत्मा अंतर्गत विविध योजनांचे मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी चऱ्होली रुपाली भोसले यांनी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी जयश्री पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदू काळोखे, अंकुश हगवणे, गणेश हगवणे, सागर हगवणे, प्रवीण हगवणे, जालिंदर हगवणे, सुदाम काळोखे, शांताराम शेवकर, महेंद्र टिळेकर, विलास जगताप, महेंद्र टिळेकर, मुकुंद बाळसराफ, योगेश बाळसराफ, सुभाष टिळेकर, सुरेखाताई टिळेकर, प्रभाकर खेडकर, अशोक जगताप,मनोज विधाटे, निखिल बाळसराफ, सोमनाथ कड, दिलीप जगताप, शरद काळोखे, बापू टिळेकर, चंद्रकांत टिळेकर व इतर उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन शांताराम शेवकर व महेंद्र टिळेकर यांनी केले. रवींद्र काळोखे यांनी आभार आभार मानले.