देहू: देहू नगरपंचायत हद्दीतील काही भागांमध्ये तीन दिवसापासून पाणीपुरवठा होऊ शकला नाही ,त्यामुळे शनिवारी (ता.12)संतप्त नागरिकांनी देहू नगरपंचायत प्रशासन विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
ऐन सणासुदीच्या काळात गावामध्ये तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासन काय झोपा काढते का ,असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली काळोखे यांनी विचारला आहे. देहू नगरपंचायत हद्दी मध्ये अनेक दिवसांपासून वीज पुरवठा समस्या आहे. गावातील वीज पुरवठा खंडित झाला ,तर त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. याचाच एक भाग म्हणून गावांमध्ये विठ्ठलवाडी बाजारआळी देहूआळंदी रोड परिसर तीन दिवस पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे या भागातील महिला आणि नागरिक संतप्त झालेले आहेत.
याबाबत देहू नगरपंचायत चे पाणीपुरवठा विभागाचे धनंजय नाईकवडी यांनी सांगितले , तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रविवारी (ता. 12) पाणीपुरवठा सुरळीत होईल.
ऐन सणासुदीत देहूत तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत
ऐन गणेशोत्सव काळात देहू नगरपंचायत हद्दीतील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला .नागरिक संतप्त.