देहू: इंद्रायणी नदीकाठी सुट्टी असल्या कारणाने फिरायला गेला . नदीमध्ये चमकदार वस्तू पाहून ती काढण्यासाठी उतरला आणि पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून एका युवकाचा देहू इंद्रायणी नदीत मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना बुधवार( ता. 16 )देहू येथे घडली .
अंकित चौहान( वय .30 वर्षे, मूळ रा. लखनऊ सध्या देहूगाव)असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित चव्हाण हा देहू येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. बुधवारी सुट्टी असल्याने तो हॉटेल जवळील इंद्रायणी नदी किनारी फिरावयास गेला. सोबत त्याचा मेव्हणा ही होता .त्याला नदीमध्ये पाण्यात चमकदार वस्तू दिसली. ती वस्तू काढण्यासाठी तो पाण्यात उतरला . पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला ..सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मुसुडगे व टीमने पाण्यात उतरून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही . मावळ आपदा मित्र टीम , वन्यजीव रक्षक मावळ संस्था निलेश गराडे ,रवी कोळी ,सजे॔श पाटील ,अनिष गराडे,प्रणव मेंगडे ,सिद्धेश दाभाडे ,ओंकार अबनावे यांनी मृतदेह शोधून काढला. देहूरोड पोलीस उप निरीक्षक माणिक मुसळे, पोलीस कर्मचारी श्री मेंगाळ, श्री .फुंदे व पोलीस पाटील सुभाष चव्हाण घटनास्थळी उपस्थित होते.
देहू इंद्रायणी नदीत बुडून वेटरचा मृत्यू
कामाला सुट्टी असल्याकारणाने नदीवर फिरायला गेलेल्या युवकाने पाण्यात चमकणारी वस्तू पाहिली आणि ती काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.