जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 05 September 2026

माळीनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, दिशा आणि आत्मविश्वास देऊन सक्षम नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात- राजेश टिळेकर

देहू: माळीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व आदरांजली वाहण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ , शिक्षक विवेक नरवडे आणि शिक्षिका मिनाक्षी वानखेडे यांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विसेसच्या एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे राजेश टिळेकर, देहू देहूरोड मंडल भाजपचे सरचिटणीस नारायण पचपिंड, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रद्युम्न टिळेकर व इतर उपस्थित होते.
यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.