देहू: एसआयआर अंतर्गत सोमवारी (ता.31)जाहीर झालेल्या अहवालानुसार, देहू नगरपंचायत हद्दीतील 21 हजार 239 पैकी 5 हजार 236 मतदारांची नावे कमी झालेली आहेत, अशी माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व देहू नगरपंचायत चे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.
चेतन कोंडे यांनी सांगितले , देहू नगरपंचायत हद्दीत एकूण 21 हजार 239 मतदार होते. त्यापैकी 563 मतदार मयत आहेत. 3 हजार 841 मतदार स्थलांतरित आहेत . तर 827 मतदार दुबार आहेत. पाच मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाही, तसेच अर्जावर सही केलेली नाही .असे एकूण 5हजार 236 मतदारांची नावे कमी झालेली आहेत. त्यामुळे आजच्या अहवालानुसार 16 हजार 3 मतदार मतदान यादीत आहेत.
तसेच 1हजार 356 मतदार मॅपिंगसाठी सापडले नाहीत. त्यांची कागदपत्रे तपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अंदाजे 2 हजार 484 मतदारांची चुकीची माहिती आहे. त्यांचेही कागदपत्रे तपासली जातील.
यावेळी लेखापाल केशव पिनोटे उपस्थित होते.
देहूत मतदार यादीतून 5 हजार 236 मतदारांची नावे कमी
देहू नगरपंचायत हद्दीतील 21 हजार 239 पैकी 5 हजार 236 मतदारांची नावे कमी झालेली आहेत,