जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 02 September 2026

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस संपन्न

विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्व आणि अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यात आली .

देहूरोड: श्री शिवाजी विद्यालय येथे विश्व संस्कृत दिवस नुकताच साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षिका सुमती उपाडे यांनी केले,
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मिलिंद शेलार,विद्यालयाच्या उपशिक्षिका वैशाली उगले , सांस्कृतिक विभाग प्रमुख रेखा साळुंखे, ज्ञानेश्वर मराडे व इतर उपस्थित होते. विद्यालयाच्या इयत्ता सातवी , आठवी , नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतचे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी मळेकर व आर्या बलकवडे या विद्यार्थिनींनी केले, कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या उपशिक्षिका सुमती उपाडे यांनी केले.आभार अक्षरा माने या विद्यार्थिनीने मानले.