जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 03 August 2026

लेण्याद्री येथे दिव्यांग व आदिवासी ठाकर समाजातील दांपत्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

जुन्नर तालुका अश्वमेघ युवा मंच आणि पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व आदिवासी ठाकर समाजातील दांपत्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

लेण्याद्री: जुन्नर तालुक्यातील अश्वमेघ युवा मंच आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व आदिवासी ठाकर समाजातील दांपत्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता. 2 )करण्यात आले होते. या सोहळ्यात सहा दांपत्यांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका संघचालक अरुण कबाडी, कार्यवाहक संदीप धानापुणे यांच्या हस्ते गणेश पूजन झाले.
माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत या नव वधू-वरांचा साखरपुडा समारंभ संपन्न झाला. बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक
नितीन महाजन यांच्या उपस्थितीत हळदी समारंभ संपन्न झाला.
आमदार सत्यजित तांबे या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते .
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, अश्वमेघ युवा मंचने आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. माझा विवाह सामुदायिक सोहळ्यात झाला होता.
शिवनेरी भूषण गुरुवर्य माऊली महाराज वाबळे, गणेश महाराज वाघमारे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा सायली बोत्रे , जुन्नर पंचायत समिती उपसभापती माऊली ढोले , जुन्नर नगर परिषद नगराध्यक्षा सुजाता काजळे, विघ्नहर साखर कारखानाचे उपाध्यक्ष अशोक घोलप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, डॉ. ताराचंद कराळे, पुनमताई चौधरी , प्रमोद बाणखिले, अनघाताई पाठक, गणेश धनविले , अंकुश आमले, मोहित ढमाले , सुमित्राताई जाधव , कल्याणी ठाकर, , राजूशेठ पिंगट , संजय वऱ्हाडी , लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ चे अध्यक्ष संजय ढेकणे , विघ्नहर देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, नंदूभाऊ तांबोळी , नगरसेवक अनिल रोकडे ,देहू शहर भाजपा अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल प्रसाद ढोमसे इतर उपस्थित होते.
यावेळी अश्वमेघ युवा मंच जुन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .
रोहित वाबळे - अध्यक्ष
ऋषी हांडे -कार्याध्यक्ष
संदीप औटी - उपाध्यक्ष
रोहित घुले- उपाध्यक्ष
ॲड. कौशल पादीर - सचिव
बंटी येंधे - सरचिटणीस
सुरज हांडे - खजिनदार.