जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 22 August 2026

देहू नगरपंचायत प्रशासनाने विश्वासात न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबविले

देहूतील चव्हाण नगर भाग 2 मधील रस्त्याचे काम का थांबविले , याबाबत आमदार सुनील शेळके यांना शेतकऱ्यांचे निवेदन. रस्त्याला विरोध नाही. मात्र जमीन सरकारी मोजणी करून मोजून घ्या.

देहू : देहू नगरपंचायत हद्दीतील चव्हाण नगर भाग दोन मधील शेतकऱ्यांनी शनिवारी(ता.22) रस्त्याचे काम बंद पाडले. शेतकऱ्यांना विचारात न घेता रस्त्याचे काम देहू नगरपंचायतने सुरू केले होते. तसेच सदर काम का थांबवले याचे निवेदन संबंधित शेतकऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांना दिले .
चव्हाण नगर भाग -2 रस्त्याचे काम दोन दिवसापूर्वी देहू नगरपंचायतने सुरू केले होते. मात्र या कामाची माहिती संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली नाही .त्यामुळे या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम थांबविले व त्याबाबतचे निवेदन आमदार सुनील शेळके यांना दिले.
या निवेदनात शेतकऱ्यांना विचारात न घेता दोन दिवसापूर्वी रस्त्याचे काम चालू केले होते, ते आम्ही बंद केले. सरकारी मोजणी न करता तसेच हद्द कायम न करता आणि कोणताही मोबदला न देता काम चालू केले आहे. तथा कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र संपादित केले, याची माहिती नाही. शासकीय नियमानुसार रस्त्या बाबत भू संपादनाची कारवाई करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे .
याबाबत शेतकरी संतोष चव्हाण यांनी सांगितले, आम्हाला कोणतीही कल्पना न देता दोन दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले .या रस्त्यात 20 ते 25 शेतकऱ्यांच्या साधारणपणे एक एक गुंठा जमीन बाधित होत आहे. आज आम्ही आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितलेली आहे. यावेळी रुपेश चव्हाण व इतर उपस्थित होते.आमदारसाहेबांनी मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना या यासंबंधी सूचना केल्या की रीतसर मोजणी करून रस्त्याबद्दल पुढील कारवाई करावी. मोजणीस कोणाची हरकत नसून शासकीय नियमानुसार काम करावे ,अश्या सूचना केल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
देहू नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले, सदरचा रस्ता हा गाव नकाशात पानंद रस्ता म्हणून आहे. पाणंद रस्ता करण्यासाठी सुरुवात केली आहे.