जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या एम.डी.पी. 19 October 2026

बाबुरावजी घोलप विद्यालय विद्यार्थ्यांनी दिले वाहतूक नियम पालनाचे संदेश

फेमस चौक, सांगवी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान उत्साहात, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण चा सहभाग

सांगवी : रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी आणि रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने फेमस चौक, सांगवी येथे ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ सोमवारी (ता .19) उत्साहात पार पडले.
या अभियानात विद्यालयाच्या स्काऊट व गाईड विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘वाहतूक नियमांचे पालन करा’, ‘हेल्मेट वापरा, जीव वाचवा’, ‘सुरक्षित प्रवास, सुखी जीवन’ अशा संदेशांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी वाहनचालक व पादचाऱ्यांचे लक्ष वेधले. सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केले.
या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे डायरेक्टर रो. निखिल अग्रवाल, रो. विवेक अग्रवाल आणि रो. पूजा अग्रवाल उपस्थित होते.
वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून, स्वतःसह इतरांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य आदिनाथ ओगले यांनी केले. उपप्राचार्या मेघा पोटे, स्काऊट-गाईड प्रमुख भारती वैद्य, प्रीती भुयार . ग्रंथपाल अनिल काळे आणि पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त पाळण्याबाबत मार्गदर्शन केले.