देहूरोड: देहू -देहूरोड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त देहूरोड पोलीस ठाण्यात “एक राखी आपल्या पोलीस बांधवांसाठी” उपक्रम राबविण्यात आला.
विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, गॅरिसन इंजिनिअरचे के .पी .हृदय कुमार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, शहराध्यक्ष रघुवीर शेलार व इतर उपस्थित होते.
दिवसरात्र आपल्या कर्तव्यावर तत्पर राहून समाजाचे रक्षण करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना माता-भगिनींनी औक्षण करून प्रेमाने राखी बांधली. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना उपस्थितांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पोलीस बांधवांच्या मनातील आपुलकीचे भाव हे या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांच्या पाठीशी कुटुंबासारखी आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा हा संकल्प असल्याचे शहराध्यक्ष रघुवीर शेलार यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन रघुवीर शेलार स्नेह ग्रुप मावळ ,
शंकरराव शेलार नागरी सहकारी पतसंस्था,
माला ताई महिला बचत गट, शिल्पाताई महिला बचत गट,
माझी बाल भवन अंध अपंग संस्था यांनी केले होते.
देहूरोड पोलीस ठाण्यात एक राखी आपल्या पोलीस बांधवांसाठी उपक्रम संपन्न
राखी म्हणजे केवळ धागा नाही, तर विश्वास, प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याची सुंदर आठवण करून देणारा सण आहे.