जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
क्रीडा ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 21 September 2026

श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटातील कॅरम खेळामध्ये यज्ञेश मुसुडगे द्वितीय क्रमांक तर इयत्ता दहावीतील गोविंद कांबळे यांस सहावा क्रमांक.

आकुर्डी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षाखालील वयोगटातील कॅरम खेळामध्ये
श्री म्हाळसाकांत विद्यालयातील इयत्ता नववी मध्ये शिकणारा यज्ञेश मुसुडगे याने द्वितीय क्रमांक तर इयत्ता दहावीतील गोविंद कांबळे यांने सहावा क्रमांक मिळविला.
या दोन्ही खेळाडूंची पिंपरी चिंचवड शहरातून विभागीय स्तरावर निवड झाली.
श्री म्हाळसाकांत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
दहावीतील हर्षल कुंभार, नववीतील अजिंक्य मुठाळ आणि आशिष वाघमारे या खेळाडूंनी पाचव्या फेरीपर्यंत
उत्तम कामगिरी केली. क्रीडा शिक्षक अशोक आवारी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.